भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील अयोध्यानगरात तरूणाचे बंद घर फोडून २ लाख ५९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, उमेश बाळू चिमणकर वय २९ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ११ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ ते सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्याचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील २ लाख ५९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेले. हा प्रकार उमेश चिमणकर याच्या लक्षात आल्यानंतर त्याने सर्वत्र शोध घेतला परंतू याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर दुपारी ३ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाथरवट हे करीत आहे.