बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।बोदवड तालुक्यातील एणगाव येथे एका महिलेचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
अधिक असे की, इंदुबाई अर्जुन अंभोरे (वय ५०, रा. एणगाव) यांचे २२ ते २३ फेब्रुवारी दरम्यान घर बंद होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेची माहिती अंभोरे यांनी बोदवड पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संतोष चौधरी करत आहेत.
चोरीच्या घटनांमध्ये वाढ
या घटनेमुळे बोदवड तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.