अर्जुन कपूरनंतर अभिनेत्री मलायका अरोरालाही कोरोनाची लागण

मुंबई प्रतिनिधी । बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर पाठोपाठ त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री मलायका अरोरादेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे. अर्जुन आणि मलायका दोघांनीही कोरोनाची लागण झाल्याची माहिती अमृता अरोरा हिने दिली आहे.

मलायका अरोराचा शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर्स’च्या सेटवर 7 ते 8 जण कोरोना संक्रमित असल्याचं समोर समजलं आणि आता मलायकादेखील कोरोना संक्रमित आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना मलायकाने आपल्यालाही कोरोना झाल्याचं सांगितलं आहे. मलायका म्हणाली, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. माझ्यामध्ये कोरोनाची लक्षणं नाही, त्यामुळे मी होम क्वारंटाइन आहे. मी लवकरच बरी होईन आणि पुन्हा मजबूत बनेन”

दरम्यान नुकतंच बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्याने सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. अर्जुनने रविवारी इंस्टाग्रामवर पोस्ट केली. सध्या अर्जुनने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वत:ला घरी क्वारंटाईन केलं आहे. “तुम्हा सर्वांना सूचित करणं माझं कर्तव्य आहे की माझा कोरोना व्हायरस अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी ठिक आहे. माझ्यात कुठलीही लक्षणं नाहीत. मी डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार घरी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी होम क्वारंटाईन आहे.” अशी पोस्ट अर्जुन कपूरने केली आहे.

 

Protected Content