Home क्रीडा सचिनच्या बॅटने खेळून आफ्रिदीने घडवला विक्रम

सचिनच्या बॅटने खेळून आफ्रिदीने घडवला विक्रम


images

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या आत्मचरित्रातून दिवसेंदिवस एकेक गुपित बाहेर पडत आहे. आधी त्याच्या वयाबाबतची माहिती पुढे आली होती. आता एक नवी माहिती समोर आली आहे, ती म्हणजे अवघ्या ३७ चेंडूत शतक झळकावत आफ्रिदीने जो विक्रम केला होता, त्यावेळी त्याने वापरलेली बॅट सचिन तेंडुलकरची होती !

 

सचिनने त्याची आवडती बॅट सियालकोट येथे वकार युनुसला दिला होती. सियालकोट क्रीडा साहित्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. तेथे या बॅटची कस्टम मेड आवृत्ती बनवण्यासाठी सचिनने ती वकारला दिली होती. ‘पण वकारने ती बॅट सियालकोटला नेण्यापूर्वी मला फलंदाजीला जाताना दिली होती. नौरोबीतले ते ऐतिहासिक शतक मी त्या सचिनच्या बॅटने केले होते,’ असे आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात लिहिले आहे.

आफ्रिदीने ११ षटकार आणि सहा चौकारांसह ही ४० चेंडूत १०२ धावांची जबरदस्त खेळी केली होती. विशेष म्हणजे आफ्रिदी त्याच्या कारकिर्दीतला दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता आणि पहिल्यांदा बॅटिंग करत होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound