नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ लाभ मिळावा- रक्षाताई खडसे

जळगाव प्रतिनिधी । जोरदार पाऊस व वादळामुळे मागील जळगांव जिल्ह्यात झालेल्या शेती नुकसान तसेच सन २०२०-२१ या वर्षातील हवामान आधारित फळ पिक विमा योजने अंतर्गत प्राप्त तक्रारी बाबत आज जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जळगांव यांच्या कार्यालय येथे खासदार रक्षाताई खडसे यांनी आढावा बैठक घेऊन कृषी विभाग अधिकारी, बँक अधिकारी व पिक विमा कंपनी अधिकारी यांना पिक विमा योजनेच्या लाभा पासून वंचित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ लाभ मिळावा याबाबत निर्देश दिले.

जोरदार पाऊस व वादळामुळे जळगांव जिल्ह्यात झालेल्या शेती मुख्यता केळी बागांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले असून सदर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात येऊन सन २०२०-२१ अंतर्गत पिक विमा उतरविलेल्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना बजाज अलायन्झ इन्सुरन्स कंपनी द्वारे पिक विम्याचा लाभ देण्यात आला होता. परंतु पिक विम्याच्या लाभास पात्र असून सुद्धा जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आलेले होते.

याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याकडे दररोज बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी येत होत्या त्यासंदर्भात सर्व शेतकऱ्यांची यादी घेऊन आज खासदार रक्षाताई खडसे यांनी पिक विमा संबंधित सर्व कृषी विभाग अधिकारी, बँक अधिकारी व पिक विमा कंपनी अधिकाऱ्यांची जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगांव यांच्या कार्यालयात बैठक घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करून पिक विमा योजनेच्या लाभा पासून वंचित नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना तत्काळ लाभ मिळावा, तसेच भविष्यात अशा प्रकारे लाभ मिळणेस विलंब होऊ नये याबाबत निर्देश दिले.

तसेच सन २०२१-२२ अंतर्गत हवामान आधारित फळ पिक विमा योजनेसाठी नव्याने नियुक्त केलेली अॅग्रीकल्चर इन्सुरंस कंपनी (एआयसी) यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून भविष्यात शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी व शंका विषयी मार्गदर्शन करणेसाठी तालुकास्तरावर पिक विमा कंपनीचे कार्यालय उघडणे बाबत निर्देश दिले.

 

 

 

Protected Content