Home क्राईम किरकोळ वादातून जळगावात वकिलाने रोखले पिस्तुल

किरकोळ वादातून जळगावात वकिलाने रोखले पिस्तुल

0
47

जळगाव प्रतिनिधी । अंगावर पाणी उडाल्याच्या किरकोळ वादातून शहरातील एका वकिलाने पिस्तुल रोखल्यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, आगामी महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने सोनू राजाराम पवार हा तरुण पुतळ्यावर पाणी मारून स्वच्छ करीत होता. या वेळी अ‍ॅड. देवेंद्रसिंग जालमसिंग जाधव यांच्या अंगावर पाणी उडाले. त्यामुळे सोनू व जाधव या दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर जाधव यांनी सोनूवर रोखल्याने उपस्थितांना धक्का बसला. उपस्थित समाजबांधवांनी जाधव यांची विनवणी केली. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हापेठचे कर्मचारी लागलीच घटनास्थळी पोहचले. त्यांना पाहून जाधव निघून गेले. दरम्यान, जाधव हे स्वत: जिल्हापेठ पोलीस स्थानकात आले असता रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound