Home Cities जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. सागर चित्रे; फटाके फोडून जल्लोष !

जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. सागर चित्रे; फटाके फोडून जल्लोष !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ॲड. सागर चित्रे यांनी अध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी ॲड. संजय राणे आणि ॲड. गोपाळ जळमकर यांचा पराभव करत अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.

या निवडणुकीसाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान पार पडले. त्यानंतर, सायंकाळी ४.३० वाजता मतमोजणी सुरू झाली. रात्री १०.३० वाजेपर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष या प्रमुख पदांचे निकाल जाहीर करण्यात आले. अध्यक्षपदासाठी ॲड. सागर चित्रे यांचे नाव जाहीर होताच, न्यायालय परिसरात त्यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला. ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.

या निवडणुकीत उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे, तर सचिवपदी ॲड. वीरेंद्र पाटील हे विजयी झाले आहेत. आपल्या विजयानंतर लाईव्ह ट्रेंड न्यूजशी बोलताना ॲड. सागर चित्रे यांनी या विजयाचे श्रेय संपूर्ण बार कौन्सिलला (वकील संघाला) दिले. त्यांच्या या विजयामुळे जळगाव जिल्हा वकील संघात नवचैतन्य निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound