मुंबई (वृत्तसेवा) सीबीआयने आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी मोठी कारवाई करत अॅड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांना मुंबईतून अटक केली.
दाभोलकर हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पुनाळेकर आणि भावे यांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. दाभोलकर हत्या प्रकरणी खटल्यात आरोपींच्यावतीने संजीव पुनाळेकर व त्यांचे सहकारी भावे हे न्यायालयात सनातन संस्थेची बाजू सातत्याने कोर्टात मांडत आहेत. . दरम्यान, पुनाळेकर व भावे यांना उद्या सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे कळते.