महिलांच्या लैंगिक छळ विरोधी कायद्यावर ॲड. मंजुळा मुंदडा यांचे व्याख्यान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक छळ विरोधी कायदा, २०१३’ या विषयावर सोमवारी, १७ जून रोजी ॲड. मंजुळा मुंदडा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, उप अधिष्ठाता डॉ. रमेश वासनिक, सहयोगी प्राध्यापक तथा अंतर्गत तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष डॉ. योगिता बावस्कर, अधिसेविका जयश्री जोगी मंचावर उपस्थित होते. डॉ. योगिता बावस्कर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. ॲड. मंजुळा मुंदडा यांनी कायद्याविषयी मार्गदर्शन करतांना सांगितले की, “या कायद्यामुळे महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची भावना निर्माण होईल आणि कामात त्यांचा सहभाग वाढेल. त्यामुळे त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि समावेशक वाढ होईल.” या कार्यक्रमात संस्थेतील विभाग प्रमुख, अधिपरिचारिका, अधिकारी-कर्मचारी, नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.

Protected Content