
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील उस्मानिया पार्क परिसरात राहणारे ५२ वर्षीय व्यक्ती हे गावात जावून येतो असे सांगून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रविवारी २१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता शहर पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अर्शद सलिम शेख वय ५२ रा. उस्मानिया पार्क, जळगाव असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरात अर्शद शेख हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता गावात जावून येतो असे सांगून ते घरातून निघून गेले. त्यानंतर ते घरी परतले नाही. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांच्या नातेवाईकांनी जळगाव शहर पोलीसात धाव घेवून खबर दिली. त्यानुसार पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ शशिकांत पाटील हे करीत आहे.



