Home क्राईम जळगावातील सुप्रीम कॉलनीतील प्रौढाची आत्महत्या

जळगावातील सुप्रीम कॉलनीतील प्रौढाची आत्महत्या


 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणाऱ्या एका प्रौढ व्यक्तीने घरगुती किरकोळ वादातून एमआयडीसीतील एका शेतात जाऊन घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीस आली. ईश्वर शामराव देशमुख ( वय 55,रा.सुप्रीम कॉलनी) असे मयताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की ईश्वर शामराव देशमुख यांचा आज घरात किरकोळ भांडण झाले. या भांडणाच्या रागातून देशमुख हे एमआयडीसी हद्दीतील एका शेतात गेले. त्याठिकाणी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. देशमुख यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. ईश्वर देशमुख यांची मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच धाव घेत एकच आक्रोश केला. या मृत्यूबाबत एमआयडीसी पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात दोन मुले दोन मुली असा परिवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound