भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळील पुलाच्या वळणावर बसने मागून धडक दिल्याने ५० वर्षीय प्रौढ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात बस वरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील बोहर्डी येथे अनिल राजाराम अंभोरे वय ५० हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सुमार बोहर्डी गावाच्या गावाजवळील वळणावर मुक्ताईनगरकडून भुसावळकडे जाणारी बस क्रमांक (एमएच २० बीएल ०७२०) ने रस्त्यावर उभे असलेले अनिल अंभोरे यांना धडक दिली त्यामुळे ते रोडवर पडून गंभीर जखमी झाले. या संदर्भात त्यांचे नातेवाईक साहेबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी ४ वाजता बसवरील चालक दिलीप जीवराम नागरूत याच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल यासीन पिंजारी करीत आहे.



