जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवाजी नगरातील ४५ वर्षीय प्रौढ व्यक्तीने धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना दुपारी उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रमेश राजन्ना लोंकलकर (वय ४५,रा.शिवाजी नगर) असे मयत प्रौढ व्यक्तीचे आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश लोंकलकर हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. बळीराम पेठेतील वैभव रेडीमेड कापड दुकानात ते कामाला आहेत. शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता कामावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. दरम्यान दुपारी जळगाव शिरसोली रेल्वे मार्गावर मोहाडी गावानजीक शिरसोली रेल्वे डाऊन मार्गावर खांब क्र.४११ (५-७) त्यांचा मृतदेह आढळून आला. एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची रेल्वे प्रबंधकांकडून खबर मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी हवालदार अनिल फेगडे व हरीलाल पाटील यांना घटनास्थळी रवाना केले. खिशात आढळलेल्या कागदपत्रावर मुलाचा मोबाईल क्रमांक असल्याने मृताची ओळख पटली. पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात आणला. लोंकलकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.