Home क्राईम आशाबाबा नगरात विजेच्या धक्क्याने प्रौढाचा मृत्यू

आशाबाबा नगरात विजेच्या धक्क्याने प्रौढाचा मृत्यू

0
35

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आशाबाबा नगरात विजेचा धक्क्याने शामकांत मधुकर पाटील (वय-५० ) या प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील जे.के.ज्वेलर्स येथे शामकांत पाटील हे वाहनचालक म्हणून कामाला आहेत. पाटील यांच्याकडे त्यांची पाचोरा येथील बहिण कल्पना पाटील ह्या आल्या होत्या. तसेच त्यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. यादरम्यान दुपारी 2 वाजेच्या सुमारास अचानकपणे वीज बंद झाली. यानंतर घरात झोपलेले शामकांत पाटील हे उठले. तसेच वरती जावून पाईप टाकत असतांना त्यांचा घराजवळून गेलेल्या वीजतारांमुळे जोरदार विजेचा धक्का बसला. या घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांना मुलासह नातेवाईकांनी तत्काळ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केले. शामकांत पाटील यांच्या पश्‍चात आई, वडील ,पत्नी ज्योती, मुलगा लोकेश व मुलगी दिप्ती असा परिवार आहे. मुलगा लोकेश हा बारावीला शिक्षण घेत आहे. याप्रकरणी डॉ. प्राची सुरतवाला यांच्या खबरीवरुन रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्‍वर कोळी करीत आहे.


Protected Content

Play sound