दुचाकी अपघातात जखमी झालेल्या प्रौढाचा मृत्यू

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील पिंपळे फाट्याजवळ दोन दुचाकीच्या अपघातात धरणगाव शहरातील ५९ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान राजधन चौधरी (वय-५९) रा. तेली तलाव, धरणगाव असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भगवान राजधर चौधरी हे गुरूवार ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजून ४५ मिनीटांनी त्यांची दुचाकी (एमएच १५ एडी ७६९३)ने घरी येत असतांना पिंपळे फाट्याजवळ मागून भरधाव वेगाने येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईई ४९५७) ने जोरदार धडक दिली. या धडकेत भगवान चौधरी यांच्या डोक्याला, छाती पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांनी धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालविली. याप्रकरणी नातेवाईक गोपाल भगवान चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीस्वारावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पवार करीत आहे.

Protected Content