यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिक्षण हक्क या कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळातील २५ टक्के राखीव जांगावरील प्रवेशासाठीची सोडत ही शुक्रवारी काढण्यात आली मात्र न्यायालयीन प्रकरणामुळे १२ जुन २०२४ बुधवार रोजी विद्यार्थ्यांची काढण्यात निवड जाहीर करण्यात येणार असल्याची माहीती यावलचे गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांनी दिली आहे. या संदर्भात राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, प्राथमिक शिक्षण संचालक माध्यमिक शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत आरटीई प्रवेशाची सोडत विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. राज्य शैक्षणीक संशोधन आणी प्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फ शैक्षणीक वर्ष २०२४-२५साठी आरटीई अंतर्गत शिक्षणासाठी मोफत प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत आहे . महाराष्ट्र राज्यातील एकुण ९ हजार २०८ शाळांमध्ये १ लाख ८ हजार२१६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध असुन , यावल तालुक्यात आरटीई अंतर्गत एकुण १७ शाळांचा समावेश असल्याची माहिती यावल पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांनी दिली आहे .दरम्यान सोडती अनुसार निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी न्यायालयाचा आदेश आल्यास १२ जुन२०२४नंतरप्रसिद्ध होईल निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लघुसंदेश प्राप्त होईल त्यानंतर तालुकास्तरावर समितीकडून कागदपत्र पडताळणी होऊन प्रवेश निश्चित होतील अशी माहिती राज्य शिक्षण विभागाकडुन देण्यात आली आहे .