जळगाव प्रतिनिधी । इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला असून याच्या अंतर्गत पदवी, पदव्युत्तर, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
ज्या उमेदवारांना पत्रव्यवहाराद्वारे पदवीधर होण्याची इच्छा आहे. अथवा कुणाचे १० वी, १२ वी परीक्षा नापास किंवा शिक्षण अपूर्ण आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी पदवी व पूर्वतयारी वर्ग हा सहा महिन्यांचा कोर्स करून बी.ए., बी.कॉम., बी.एस.डब्ल्यू. व बी.टी.एस. या कोर्सच्या कोणत्याही एका पदवीच्या प्रथम वर्षास प्रवेशित होऊ शकतात. अशा उमेदवारांसाठी संगणकशास्त्र विषयात बी.सी.ए, एम.सी.ए, बी.टी.एस, एम.टी.एस, बी.ए., बी.कॉम., बी.लिब, एम.लिब, एम.ए. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, हिंदी, लोकप्रशासन, बी.एस्सी (नर्सिंग), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रुरल डेव्हलपमेंट, एम.ए.(रुरल डेव्हलपमेंट), एम.एस.डब्ल्यू. तर विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी ३१ जुलैपूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र द्वारा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पहिला मजला ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी भवन, जळगाव येथे दुपारी ४.०० ते ६.३० व रविवारी सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत यावेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.