जळगाव, संदीप होले | शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अनेक उच्चशिक्षित युवकांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ढोल ताशाच्या गजरात युवा सेनेमध्ये प्रवेश केला.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला तरुणांनी शिवसेना, युवा सेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल प्रथमतः जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे उपनेते या या नात्याने सगळ्यांचं स्वागत केलं. याप्रसंगी शिवसेनेत प्रवेश केलेल्या युवकांना, “कायम अन्यायाच्या विरोधात लढणारी संघटना म्हणून शिवसेनेची ख्याती राहिलेली असून ८०% समाजसेवा आणि २० टक्के राजकारण हेच शिवसेनेचे ब्रीद आहे. त्यामुळे आपणसुद्धा गरीब, पिडीत माणूस आपल्याकडे आला तर निश्चितपणे त्याला आपल्या परीने मदत करावी. असे आवाहन केले.
पालकमंत्र्यांनी केली ‘शिवसेना’ या शब्दाची फोड
पुढे युवकांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, “आपल्यासारख्या तरुणांकडून या देशाची, जिल्ह्याची सेवा घडत असताना जिथे जिथे संधी मिळेल तिथे समाजोपयोगी कार्य करावे असं सांगत ‘शि’ म्हणजे शिस्तबद्ध, ‘व’ म्हणजे वचनबद्ध, ‘से’ म्हणजे सेवाभावी आणि ‘ना’ नामर्दांना तिथे स्थान नाही अशी मर्दाची संघटना म्हणजे शिवसेना. अशी ‘शिवसेना’ या शब्दाची फोड त्यांनी केली. आज शिवसेनेत प्रवेश केलेल्या युवकांचे अभिनंदन आणि स्वागत केलं.
व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/427918485795912