रावेर प्रतिनिधी । शहर व ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून नगरपालिका व पंचायत समिती प्रशासनातर्फे खबरदारी घेतली जात आहे. रावेर नगरपालिका हद्दीत सद्या दोन कोरोना एक्टिव रुग्ण आहे. तर ग्रामीण भागात पाच पेशंट एक्टिव आहे. रुग्ण संख्या वाढू नये म्हणून शहरात मुख्याधिकारी व ग्रामीण भागात बीडीओ कडून खबरदारी घेतली जात आहे.
रावेर नगर पालिका व पंचायत समितीच्या कुशल प्रशासनामुळे कोरोना वायरस कमालिचा कंट्रोल मध्ये आहे. तरी सुध्दा काळजी घेण्याचे व तोंडाला मास्क लावुनच घरा बाहेर निघण्याचे अवाहन नगर पालिका व पंचायत समिती प्रशासकांनी केले आहे.रावेर नगर पालिकेचे मुख्यधिकारी रविंद्र लांडे यांनी मास्क वापरण्यासाठी शहरात सहा पथके तयार केले असून पाच मंगल कार्यालयांना नोटीसा दिल्या आहे.तर कोणात्याही सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी बंधनकार ठेवल्याचे लाईव्ह’ला सांगितले.
ग्रामीण भागात कोरोनाची स्थिती अनुकूल
रावेर ग्रामीण भागात देखिल कोरोना वायरस आटोक्यात असून पाच पेंशट एक्टिव आहे.येथील रावेर पंचायत समितीच्या बीडीओ दिपाली कोतवाल यांनी खबरदारी म्हणून पुन्हा सज्ज झाले असुन ग्राम पंचायत स्तरावर पथके तयार करण्यात येणार असून विना मास्क फिरणा-यांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी ग्राम सेवकांना दिल्या आहे.तसेच नागरीकांची देखील खबरदारी घ्यावी घराबाहेर निघतांना मास्क लावूनच निघण्याचे अवाहन त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून केली आहे.
यापुढे परवानगी बंधनकारक
रावेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाया योजना बंधनकारक केले आहे.यामध्ये लग्न समारंभ अंत्यविधी तसेच इतर कार्यक्रमांना परवानगी घेणे बंधनकारक आहे.एकावेळी ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास त्यांचेवर कारवाई होणार आहे. भाजीपाला मार्केट , शॉपींग कॉम्प्लेक्स , मॉल या ठिकाणचे दुकानदारांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा एका वेळेस ५ ग्राहकच उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. जे ग्राहक व नागरीक मास्कचा वापर करणार नाही त्यांना ५०० रुपये दंड करण्यात येणार असल्याचे पालिका व पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.