जळगाव प्रतिनिधी । युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या आगामी दौर्याच्या नियोजनासाठी रविवारी केमिस्ट भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे हे १८ जुलै रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत. या अनुषंगाने रविवार दिनांक १४ रोजी शहरातील केमीस्ट भवनात नियोजनासाठी बैठक घेण्यात येणार आहे. याप्रसंगी राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत व विलास पारकर, युवा सेना विस्तारक कुणाल दराडे, आमदार किशोर पाटील, चंद्रकांत सोनवणे, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, महिला जिल्हा प्रमुख महानंदा पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीला पदाधिकारी लोकप्रतिनिधी महिला आघाडी नगरसेवक युवा सेना पदाधिकारी व संबंधीत संघटनांच्या पदाधिकार्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे यांनी केले आहे.