Home Cities धरणगाव आदित्य ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी; अवघे धरणगाव भगवेमय

आदित्य ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी; अवघे धरणगाव भगवेमय

ddc374b7 ed17 4887 9346 00ee5e74af3d
ddc374b7 ed17 4887 9346 00ee5e74af3d

ddc374b7 ed17 4887 9346 00ee5e74af3d
 

धरणगाव (प्रतिनिधी) युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजपासून जळगाव जिल्ह्यातून प्रारंभ होत आहे. जळगाव ग्रामीण -धरणगाव, पाचोरा, एरंडोल, चोपडा व अमळनेर या पाच विधानसभा क्षेत्रात जन आशीर्वादयात्रा जाणार आहे. दरम्यान, धरणगावात आज दुपारी होणाऱ्या सभेची जय्यत तयारी शिवसेनेकडून पूर्ण झाली असून संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे.

 

जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शिरसोली येथे वृक्षारोपण व स्वागत झाल्यावर सकाळी साधारण 11 वाजता पाचोरा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक लक्ष्मीनगर याठिकाणी भव्य जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर भडगाव, कासोदा, एरंडोल येथे संवाद झाल्यावर धरणगाव येथील इंदिरा गांधी हायस्कुल जवळील मैदानात विजयी संकल्प सभा दुपारी ३:३० आयोजित करण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या स्वागताची फलक लागली असून शिवसैनिकांमध्ये जल्लोष दिसत आहे. दरम्यान, आजच्या सभेत ग्रामीण भागासह शहरातील काही राजकीय दिग्गज्जांचा शिवसेना प्रवेश होणार आहे. सभेला उपस्थितीचे आवाहन जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ,नगराध्यक्ष सलीम पटेल, गटनेते पप्पू भावे, उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील सर यांनी केले आहे.


Protected Content

Play sound