अमळनेरातून अप्पर पोलिस आयुक्त साहेबराव पाटील विधानसभेसाठी उत्सुक !

7133b585 0831 4f83 afa0 0e4f576fba60

अमळनेर (ईश्वर महाजन)  अमळनेरातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक असून, अनेकांनी देव पाण्यात टाकले आहेत. त्यातच पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी व पुण्याचे अप्पर पोलिस आयुक्त साहेबराव पाटील हे आणखी एक उमेदवार अमळनेरातून निवडणूक लढवण्याची तयारी करीत असून, तालुक्याचा समस्यांबाबत आढावा घेताना दिसत आहेत. साहेबराव पाटील यांनी नुकतीच मारवड परिसरात भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील जनता कुणाच्या बाजूने उभी राहील, हे सध्यातरी सांगणे कठीण आहे.

 

अमळनेर मतदार संघातून भाजपाचे सहयोगी सदस्य आमदार शिरीष चौधरी यांनाही भाजपाकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यातच माजी आमदार साहेबराव पाटील यांचीही सध्या भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांशी जवळीक वाढल्याने ते ही भाजपकडून तिकीट मागून निवडणूक लढवू शकतात. भाजपने तिकीट दिले नाही तरी साहेबराव पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहेतच. कारण अमळनेरात त्यांना मानणारा मतदार आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने ऐनवेळी खासदारकीचे तिकीट न मिळाल्याने अनिल भाईदास पाटील हे विधानसभेत उमेदवारी करतीलच अशी शक्यता आहे.

यावेळी आयुक्त साहेबराव पाटील यांनी मारवड, बोहरा, पाडळसरे या गावांसह धरणालाही भेट दिली. मारवड येथील वि.का.सो.च्या प्रांगणात त्यांनी गावातील ज्येष्ठ व वरिष्ठ नागरिकांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, “लोकसभेसाठी तयारी करण्याचा माझा मनोदय होता. मात्र वेळ कमी मिळाल्याने मी अमळनेर विधानसभेत प्रधिनित्व करण्याचे ठरवले आहे. अनेक दिवसांपासून मी अमळनेर मतदासंघातील गावांना भेटी देत असून प्रत्येक ठिकाणी मला दोनच प्रमुख समस्या जाणवल्या. रोजगार व पाण्याचा प्रश्न तालुक्यासाठी महत्त्वाचा असून ह्या प्रश्नावर काम करण्याची माझी तयारी आहे. तसेच धरणाच्या कामासाठी व उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी माझा प्रशासकीय अनुभव वापरून मी निधी आणू शकतो.” असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी शत्रुघ्न पाटील (पाडळसरे) मारवड येथील ग्रा.विकास संस्थेचे संचालक देविदास शामराव पाटील, शरद भालचंद्र पाटील, शिक्षक नेते रावसाहेब मांगो पाटील, गोकुळ फकिरा पाटील, दिलीप गुलाबराव पाटील, डी.एल. भाऊसाहेब, देविदास धोबी, बाळासाहेब साळुंखे, सी.वाय. पाटील, एन.एस. पाटील, अनिल पाटील, प्रकाश हेमलाल पाटील, बापू बडगुजर तसेच गोवर्धन व बोरगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान पाडळसरे धरणाला दिलेल्या भेटीप्रसंगी साहेबराव पाटील यांनी धरणावर भेट देऊन कामाची पाहणी केली. तालुक्यासाठी हे धरण जीवनदायी असताना निधी अभावी अपूर्णावस्थेत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली.

Add Comment

Protected Content