पुणे (वृत्तसंस्था) मूळ जळगाव जिल्ह्यातील असलेले तथा सध्या पुण्याचे अपर पोलीस आयुक्त असलेले साहेबराव पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे वृत्त आहे. भाजपने उमेदवारी दिल्यास पदाचा राजीनामा देऊन ते निवडणूक लढवू शकतात,अशी चर्चा आहे. दरम्यान, याबाबत त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाहीय.
जळगाव जिल्हा पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील मूळ रहिवासी तथा पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त साहेबराव पाटील हे मागील ३० वर्षांपासून पोलीस दलात सेवा बजावत आहेत. त्यांच्या सेवेचा कार्यकालही लवकरच पुर्ण होणार असल्यामुळे ते राजकारणात उतरण्यास इच्छुक असल्याचे कळते. त्यानुसार साहेबराव पाटील हे जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर लढण्यास तयार असल्याची चर्चा आहे. अगदी भाजपने उमेदवारी दिल्यास ते पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे कळते. दरम्यान, भाजपने अद्याप उमेदवारांची घोषणा केली नसल्याने साहेबराव पाटील यांना जळगावमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचेही चर्चा आहे. दरम्यान, भाजपकडून लोकसभेसाठी यापुर्वी पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा इतिहास आहे.
जळगाव लोकसभा उमेदवारी ए.टी.पाटील यांना दिली तर मंत्री होऊ शकतात परंतु काही लोकांना त्यांना मंत्री होण्यापासुन थांबवयाचे म्हणुन ही ऐवढी षडयंत्र सुरू आहेत.ते पुन्हा चांगले मताने निवडुन येऊ शकतात ही काळ्यादगडा वरती रेष आहे.