जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोराना अहवालानुसार जिल्ह्यात आज दिवसभरात नव्याने ७ रूग्ण आढळून आले आहे. तर ११ रूग्णांची कोरानावर मात करून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात नव्याने सात कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. तर ११ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
सध्या जिल्ह्यात ६९ रूग्ण कोरोना बाधित असून उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार ८३६ रूग्ण आढळून आलेत. त्यापैकी १ लाख ४९ हजार १६५ कोरोना रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्याप्रमाणे २ हजार ५९२ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे.