पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील सुभाष देसले व किशोर पाटील, केंद्र प्रमुख प्रवीण पाटील (दुसखेडा), अनिल जाधव (माहेजी), राजू पटेल (अंबे वडगाव) या तीन केंद्र प्रमुखांसह ३२ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती वसंत गायकवाड, उपसभापती अनिता चौधरी, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, भा.ज.पा चे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, माजी सभापती बन्सी पाटील, सुभाष पाटील, गटविकास अधिकारी अतुल पाटील, जिल्हा परिषदेचे प्रभारी उपशिक्षण अधिकारी, विकास पवार, गटशिक्षण अधिकारी विकास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी, समाधान पाटील, सरोज गायकवाड, नगरदेवळा येथील सरपंच प्रतीक्षा पाटील, पिंपळगाव (हरे.) येथील प्रभारी सरपंच सुखदेव गीते, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे, शिखक प्रतिनिधी गुलाबराव पाटील, महेंद्रसिंग पाटील, राजेंद्र पाटील, सुनिल पाटील, केंद्र प्रमुख आर. डी. पाटील, विजय धनराळे, गुणवंत पवार, मौलाना अरमान उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी विकास पाटील, सूत्रसंचालन स्वाती अमृत पाटील , किशोर पाटील यांनी केले तर कार्यक्रमाची सुरवात वैष्णवी थोरात, रुपेश पाटील, सागर थोरात यांनी गायलेल्या गीतांनी करण्यात आले.
या शिक्षकांचा झाला गौरव
प्रविण आत्माराम पाटील (जिल्हा परिषद शाळा, दुसखेडा), कृष्णा आत्माराम तपोणे (लोहारा कन्या), स्वाती दौलतराव पाटील (नांद्रा), साहेबराव बळीराम पाटील (पहाण), विजया भालचंद्र पाटील (बाळद), हिलाल अन्ना पाटील (निपाणे), कैलास पुंडलीक पाखले (खाजोळे), वैशाली दामोदर पाटील (अंतुर्ली खु”), मिना लिलाधर हिवरे (पाचोरा कन्या), स्वप्नील विजयशिंग पाटील (सारोळा), कल्पना तुकाराम पाटील (बिल्दी), नवल भिमराव ठोंबरे (वडगाव कडे), महेश दिनकर सोनवणे (गव्हले), राजीव रामदास पद्मे(सावखेडा खु”), नारायण मांगो राठोड (नाईकनगर), शेख सलाउद्धिन शेख गौस(सातगाव डोंगरी उर्दू), पंकज राधेशाम पालिवाल (शहापूरा), भास्कर दिलीप वानखेडे (लासगांव), गायत्री सुभाष पाटील (वडगाव), मनोज भिकन दुसाने(वडगांव बु”), भिकन श्रावण अहिरे (होळ), नयना भिला पाटील (नेरी), अनिल बाबूराव वराडे (पुनगाव), पुष्पलता आनंदराव पाटील (कृष्णरावनगर), ज्योती शशिकांत महालपूरे (तारखेडा बु”), पृशोत्तम ज्ञानेश्वर पाटील (मोहाडी), मुकुंद अन्नासाहेब कडूस (पिंपळगाव तांडा), सुभाष गंभीर पाटील (सातगांव तांडा), कुमोदिनी महारु देवरे (वरखेडी), राजू रफिद पटेल (आंबे वडगांव), सैय्यद करीम सैय्यद मोहम्मद अली (कुऱ्हाड उर्दू), अनिल भगवान जाधव (माहेजी), यांनी पूरस्कार स्विकारण्यासाठी पती पत्नी सह उपस्थित राहावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले आहे.
आदर्श पुरस्कारात वशिलेबाजी झाल्याची शिक्षकांकडून चर्चा
पाचोरा तालुक्यात ३२ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार जाहीर करताना ते पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य यादी तयार करतात की गुणवत्तेनुसार गटशिक्षणाधिकारी करतात या बाबत अनेक शिक्षकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू होती. शिक्षक पुरस्काराच्या कार्यक्रमात आदर्श ग्रामपंचायती पुरस्काराचा कोणताही उल्लेख नसताना शिक्षक पुरस्कारासाठी सकाळी दहा वाजल्यापासून उपस्थित होते. एन वेळी ग्रामपंचायतीचे पुरस्कार प्रथम जाहीर केल्याने शिक्षकांमध्ये कुजबुज होऊन नाराजीचा सूर पहावयास मिळाला. सकाळी ११ वाजेची कार्यक्रमाची वेळ असताना कार्यक्रम १ वाजता सुरू झाला होता.
पुरस्कार देतांना पदाधिकाऱ्यांकडून होत असलेला हस्तक्षेप बंद करा – माजी सभापती सुभाष पाटील यांचा घरचा आहेर
पाचोरा येथील राजीव गांधी टाऊन हॉल मध्ये जिल्हा व तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जि. प. सदस्य मधुकर काटे, तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर भाजपा चे माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आदर्श शिक्षक” पुरस्काराची यादी ही त्या शिक्षकाची खरी गुणवत्ता व पात्रता बघुन गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांनी केली पाहिजे. मात्र सद्यस्थितीत त्यांना विश्वासात न घेता आपले पदाधिकारी वशिलेबाजी करुन मर्जीतील शिक्षकांनाच आदर्श शिक्षक पुरस्कार देत आहेत. याबाबतीत पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप बंद करावा. असे सुभाष पाटील यांनी सांगताच उपस्थित शिक्षकांनी टाळ्यांचा गडगडाट केला. पाचोरा पंचायत समितीत भाजपाची एकहाती सत्ता असुन सुभाष पाटील हे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. त्यांना ही बाब सहन न झाल्याने त्यांनी उपस्थित भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर दिला. नंतर गट शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सारवासारव केली. मात्र शिक्षकांमध्ये अनावर कुजबुज सुरु झाली होती.