अदानी आणि अंबानी जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत

दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जगातील सर्वात  श्रीमंत लोकांच्या पहिल्या दहामध्ये गौतम अदानी आणि मुकेश अंबानी हे दोन भारतीय आहेत. अदानी यांनी वॉरेन बफेट यांनाही मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत पाचवे व्यक्ती होत नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे.

फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता जगातील पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती बनले आहे. 123.3 अब्ज डॉलर्स इतकी एकूण संपत्तीचे मालक असलेले अदानी पाचव्या स्थानी आले आहेत तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात 10 श्रीमंत लोकांपैकी हे अदानी आणि अंबानी हे दोन भारतीय आहेत.

या यादीत टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत. त्याची एकूण संपत्ती 269.70 अब्ज डॉलर्स इतकी आहे. जेफ बेझोस 170.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नॉल्ट आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 166.8 अब्ज डॉलर्स एवढी आहे आणि या यादीत ते तिसरे आहेत.

Protected Content