यावल, प्रतिनिधी | तालुका वकील संघाची नुकतीच एक सभा होवुन या सभेमध्ये अॅड. विनोद एम. परतणे यांची अध्यक्षपदी व अॅड. धीरज व्ही. चौधरी यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच ग्रंथपाल म्हणून यांचीही निवड करण्यात आली आहे.
सदर सभेवेळी ॲड.एस.जी. कवडीवाले, ॲड.आर.पी. गडे, ॲड.के. डी. पाटील, ॲड.एस.आर. लोंढे, ॲड.नितिनएम. चौधरी, अँड.ए.आर. सुरळकर, ॲड.जी.एम. बारी, ॲड.एस.एस. कुलकर्णी, अँड.खालीद ए. शेख, ॲड.ए.एम. कुलकर्णी, ॲड.यु.सी. बडगुजर, ॲड.मोहीत शेखअमीन, ॲड.निवृत्ती पी. पाटील, ॲड.देवेंद्र आर. बाविस्कर, ॲड.के.डी.सोनवणे, ॲड.गौरव के. पाटील, ॲड.दत्तात्रय सी. सावकारे आदी वकील उपस्थित होते. येथे वकील संघाचे अध्यक्ष व सचिव बिनविरोध निवडून देण्याची आदर्श परंपरा आहे. वकील संघातर्फे नविन पदाधिका-यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच सर्व परिसरातुनही नूतन अध्यक्ष व सचिव यांचे अभिनंदन केले जात आहे.