Home Cities रावेर पाल पर्यटन क्षेत्राला अभिनेत्री प्रिया मराठे यांची भेट

पाल पर्यटन क्षेत्राला अभिनेत्री प्रिया मराठे यांची भेट


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाल येथील नियोजीत जंगल सफारीच्या महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या ब्रँडअँबेसेडर असलेल्या अभिनेत्री प्रिया मराठे यांनी भेट देऊन व विविध पर्यटन स्थळाला भेट देऊन माहिती घेतली.

यावेळी उपवनसंवरक्षक यावल जमीर शेख यांच्या संकल्पनेतुन यावल वनविभागाने तयार केलेली दिनदर्शिका यावेळी भेट म्हणून अभिनेत्री प्रिया मराठे यांना देण्यात आली.यावेळी त्यांनी प्रस्ताविक सातपुडा एंट्री सफारी गेटची पाहणी केली तसेच गारबर्डी डॅमची पाहणी केली त्यानंतर अंजन व अनुपन एहट विश्रामगृहाची पाहणी केली व पाल पार्कला भेट देऊन त्यांनी सर्व पर्यटन विभाचे छायाचित्रन करून व्हिडिओ शूट केला.

यावेळी त्यांच्या सोबत वनक्षेत्रपाल अजय बावणे व वनपाल अरूणा ढेपळे सोबत राहून पाल पर्यटन विभागाची माहिती दिली. अभिनेत्री प्रिया मराठे या अनेक मराठी मालिका तसेच पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या आहे.जळगाव जिल्ह्यातील निवडक दहा ऐतिहासिक पर्यटन स्थळाचां सोशल मिडियावर प्रसारित करणाच्या हेतूने अतिऊच्च दर्जाच्या रिल्स तयार हेतुने त्यांनी पाल टूरिझमला भेट दिली.


Protected Content

Play sound