Home राष्ट्रीय आसामी अभिनेत्रीचे उल्फाशी संबंध

आसामी अभिनेत्रीचे उल्फाशी संबंध

0
28
janhavi saikia

janhavi saikiaगुवाहाटी वृत्तसंस्था । उल्फा या दहशतवादी संघटनेशी संबंधासह बाँबस्फोटात सहभागी असल्याचा आरोपावरून आसामी अभिनेत्री जान्हवी सैकिया हिला साथीदारासह अटक करण्यात आली आहे.

बुधवारी सायंकाळी गुवाहाटीत एका शॉपिंग मॉलसमोर आणि शहराच्या मध्य भागातील बागेसमोर बुधवारी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाले होते. यात या स्फोटात ११ जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा गुवाहाटी पोलिसांनी तपास सुरु केला असून या स्फोटांप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. यात आसामी अभिनेत्री जान्हवी सैकिया आणि तिचा साथीदार राजगुरू यांचा समावेश आहे. त्यांच्या घरातून स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले. यात २० किलो गनपावडर, बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे अन्य साहित्य, ९ एमएम पिस्तूल आणि आदींसह उल्फाच्या प्रचारपत्रकांचा समावेश आहे. जान्हवीने आसामी भाषेतील काही मालिकांमध्ये काम केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound