चाळीसगाव (प्रतिनिधी) सह्याद्री प्रतिष्ठान, भुजल सर्वेक्षण विभाग, राज्य पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गडावरील पिण्याचे तलाव व टाक्या यांचा नैसर्गिक स्त्रोत पुनर्जीवित करण्यात येणार आहे. येत्या बुधवारी तिघंही विभागाची या संदर्भात संयुक्त बैठक होणार आहे.
यात प्रामुख्याने महत्वपूर्ण गडावरील मोजक्या गडाची निवड होऊन पावसाळा संपल्यास काम सुरू होईल. यासंदर्भात महाराष्ट्र भुजल सर्वेक्षण विभागाचे राज्य संचालक कौस्तुभ दिवेगावकर (IAS) यांची भेट घेतली. अत्यंत कार्यक्षम अधिकाऱ्यामुळे येणाऱ्या काळात गडावरील कांही टाक्या पुनर्जीवित होतील. श्री. श्रमीक सरांचे भाऊ नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्यामुळे हा सुवर्णयोग जुळून आला आहे.