नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काही जण शेतकर्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत असल्याचा आरोप करत संबंधीतांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
आज केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कृषी कायद्याबाबत सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले की, शेतकर्यांना त्यांचे पीक भारतात कोठेही विकता येऊ येण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळायला हवे, कोणीही ते रोखणार नाही. शेतकर्यांच्या पिकांवर स्वतंत्रपणे कर आकारला जाणार नाही. यावर्षी भारत सरकारने एमएसपी अंतर्गत ६० हजार कोटी धान्य खरेदी केले असून त्यापैकी ६० टक्के पंजाबमधून खरेदी करण्यात आले आहे.
रविशंकर पुढे म्हणाले की, जर कोणी शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर भारताला तोडणारे लोक शेतकरी आंदोलन कर्त्यांच्या खांद्यावरुन बंदुक ठेवून चालवायचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल. आम्ही यात कोणतीही तडजोड करणार नाही. आंदोलन करणे हा आपल्या देशातला एक प्रमुख केंद्रबिंदू आहे. आम्ही शेतकर्यांचे हित किंवा विरोधी पक्षांचे राजकीय हितसंबंध देशासमोर ठेवू असे रविशंकर म्हणाले.