मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणावर माध्यामांना प्रतिक्रिया दिली. शाळा, कॉलेज, पब आणि इतर ठिकाणांजवळ ड्रग्ज सप्लायर, ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यावर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
ड्रग्जच्या माध्यमातून तरुणांचे भविष्य उद्धवस्त करणाऱ्यांना कोणीही सोडले जाणार नाही. ड्रग्ज रॅकेट फक्त पुण्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून उखडून टाकू, असं आश्वासनही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.