अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील बहादरवाडी गावाच्या फाट्याजवळून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता अमळनेर पोलिसांनी कारवाई करत जप्त केले आहे. याप्रकरणी सकाळी ७ वाजता ट्रॅक्टर चालकाविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील बहादरवाडी फाट्याजवळून ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पथकाने शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता तालुक्यातील बहादरवाडी गावाच्या फाट्याजवळ कारवाई करत विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पकडले. यावेळी ट्रॅक्टर चालक शरद यशवंत भोई (वय-२७, रा. भोईवाडा पैलाड, ता. अमळनेर याला वाळू वाहतुकीबाबतचा परवाना विचारला. दरम्यान त्याच्याकडे परवाना नसल्यामुळे उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान पोलिसांनी वाळूचे वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी सकाळी ७ वाजता पोलीस कॉन्स्टेबल हितेश बेहेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक शरद यशवंत भोई यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील हे करीत आहे.