
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ढाकेवाडी परिसरात हातात लोखंडी तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या गणेश समाधान मराठे वय २२ रा. हनुमान नगर, रामेश्वर कॉलनी या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी बुधवारी ९ जुलै रोजी रात्री ८ वाजता कारवाई केली आहे. त्यांच्याकडून लोखंडी तलवार जप्त केली असून रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील ढाकेवाडी परिसरात संशयित आरोपी गणेश मराठे हा हातात लोखंडी तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने बुधवारी ९ जुलै रोजी रात्री ८ वाजता संशयित आरोपी गणेश मराठे याच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून लोखंडी तलवार जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.



