लोखंडी सुरा घेऊन फिरणाऱ्या संशयित तरुणावर कारवाई

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील मोहम्मद नगर परिसरातील बिलाल दुकानासमोर गुरुवारी १६ मे रोजी रात्री १०.३० साडेदहा बेकायदेशीररित्या लोखंडी सुरा घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणावर कारवाई केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख दानिश शेख सलीमोद्दीन वय-१८, रा. मोहम्मद नगर भुसावळ असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील मोहम्मद नगरात गुरुवारी १६ मे रोजी रात्री १०.३० वाजता बेकायदेशीररित्या संशयित आरोपी शेख दानिश शेख सलीमउद्दीन हा लोखंडी सुरा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी शेख दानिश शेख सलीमोद्दीन यांच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून लोखंडी सुरा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भूषण चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवार १७ मे रोजी मध्यरात्री १ वाजता संशयित आरोपी शेख दानिश शेख सलीमोद्दीन यांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर हे करीत आहे.

Protected Content