जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा विकणाऱ्या रेल्वे स्थानकाजवळील राहूल पान सेंटरवर अन्न, औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्तांच्या पथकाने सोमवारी २७ नोव्हेंबर रेाजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत दुकानातून ४२ हजार ८३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रवीण हिरामण पाटील (वय-४२, मूळ रा. फत्तेपूर ता. जामनेर, ह. मु. जळगाव) या दुकान चालकाविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, अन्न सुरक्षा अधिकारी सहाय्यक आयुक्त शरद पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील राहूल पान सेंटर येथे गुटखा विक्री केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाईसाठी सहाय्यक आयुक्त शरद पवार हे सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पंचासह त्याठिकाणी गेले. त्यांनी दुकान चालकाला ओळख देवून दुकानाची तपासणी केली. या तपासणीत त्यांना दुकानात विक्रीसाठी ठेवलेले पान, कोल्ड्रींक्स, चॉकलेटसह शासनाने प्रतिबंधित केलेले पानमसाला व गुटखा मिळून आला. पथकाने याठिकाणाहून ४२ हजार ८३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी प्रवीण हिरामण पाटील (वय ४२, मूळ रा. फत्तेपूर ता. जामनेर, ह. मु. जळगाव) या दुकान चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.