धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातून अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर धरणगाव महसूल पथकाने गुरूवार ६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई करत जप्त केला आहे. यावेळी पथकाला पाहून डंपरचालक हा वाहन सोडून पसार झाला आहे. या संदर्भात रात्री १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात डंपरवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव शहरातून डंपरमधून अवैधपणे वाढू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती धरणगाव महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने गुरुवारी ६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव शहरातील भावे गल्ली परिसरात कारवाई केली. यावेळी पथकाला पाहून डंपरचालक गणेश पंडित पवार रा. बांभोरी ता. धरणगाव याने घटनास्थळी वाहन सोडून पसार झाला होता. दरम्यान महसूल पथकाने डंपर क्रमांक (एमएच ०४ एफजे ८०८३) हा ताब्यात घेतला आहे. या ट्रकमध्ये जवळपास दोन ब्रास वाळू आढळून आला. दरम्यान पोलिसांनी वाळूसह जप्त केला आहे. यासंदर्भात धरणगावचे मंडळाधिकारी भरत पारधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता ट्रक चालक गणेश पंडित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंदुलाल सोनवणे करीत आहे.