जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील चौगुले प्लॉट परिसरामध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार करून खाजगी वाहना भरत असलेल्या एकावर शनीपेठ पोलिसांनी कारवाई केले आहे. त्याच्याकडून गॅस भरतांनाचे वाहन, गॅसचे सिलेंडर, यास गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण ४ लाख ९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौगुले प्लॉट परिसरात घरगुती गॅसचा काळाबाजार करून रिक्षात भरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पथकाने कारवाई करत संशयित आरोपी भगवान लक्ष्मण कोळी (वय-४७, रा. चौगुले प्लॉट, शनिपेठ जळगाव) यांच्याकडून गॅसचे सिलेंडर, गॅस भरण्याचे साहित्य आणि गॅस भरत असताना सापडलेले वाहन असा एकूण ४ लाख ९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार पराग दुसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भगवान लक्ष्मण कोळी यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे करीत आहे.