चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील लासूर येथे बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलीसांनी धडक कारवाई केली. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील लासूर गावातील उत्तम ट्रेडर्स दुकानासमोर १४ एप्रिल मध्यरात्री सकाळी ४ वाजता प्रकाश भगावन भिल चालक ट्रक्टर घेवून अवैधरित्या वाळूची वाहतूक करतांना आढळून आले आहे. बेकायदेशीर वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शशीकला पारधी यांच्याफिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय यदे करीत आहे.