Home क्राईम बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

0
33

रावेर प्रतिनिधी । वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रावेर महसूल विभागाने कारवाई करत ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. याबाबत किती दंड आकरण्यात आला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

सविस्तर असे की, गेल्या आठवड्यात मंडळाधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळे, यासीन तडवी आणि कोतवाल गणेश चौधरी यांनी तालुक्यातील पुनखेडा जवळ बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर करवाई करत ट्रक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले आहे. या कारवाईत ट्रक्टरवर किती दंड आकारण्यात आला याची माहिती मिळालेली नाही.


Protected Content

Play sound