निमखेडी शिवारातून वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । निमखेडी शिवारातील गिरणा नदीच्या पात्रातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई केली. याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदीच्या पात्रातून बेकायदेशी वाळूची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी महसूल विभागाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दाखल घेतल जळगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार विशाल सोनवणे व त्यांच्या पथकाने  बुधवार २२ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास निमखेडी शिवारात गिरणा पात्रात अवैधपणे वाळूचा उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर धडक कारवाई केली. याठिकाणी (एमएच १९ सीव्ही ३६३४) क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर धडक केली कारवाई करत असताना ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर व टाली घेऊन पळवत होता. त्याचा महसूल पथकाने पाठलाग केला. नंतर चालकाने ट्रॅक्टर व ट्रॉली सोडून पसार झाला. महसूल पथकाने ट्रक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात दुपारी ११ वाजता अज्ञात ट्रक्टर चालकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

 

 

Protected Content