पाचोरा प्रतिनिधी । गेल्या दोन वर्षापासून पाचोरा तालुक्यात अवैधरित्या झाडांची कत्तल करून वाहतूक होत असल्याने यामध्ये वनविभागाचे अधिकारी यांचा देखील समावेश असून हप्ते घेवून सर्रासपणे लाकडांची वाहतूक होत असल्याची आरोड नागरीकांकडून होत आहे. असाच प्रकाराता वनविभागाचे पितळ उघडे पडले असून चक्क तक्रारदारवरच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली असल्याचा प्रकार आज सायंकाळी 5 वाजेचा सुमारास झाला. दरम्यान ज्याने लाकडांचा साठा केला आहे त्यांच्यावर कारवाई न केल्याने परीसरात नागरीकांकडून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव येथून आलेले वनविभागाचे अधिकारी यांनी अचानकपणे रोड भागातील स्वामी मध्ये विजिट दिली असतात त्या विजिटमध्ये पाचोरा नाकी दाराच्या आशीर्वादाने अवैध वृक्षतोड होत असून याचा विविध ठिकाणी साठा जप्त केला जात आहे, अशी तक्रार जगदीश युवराज पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचे म्हणण्यानुसार हवेत साठ्याची पाहणी करून त्या लाखांचे पंचनामा करून कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर पाचोरा वनविभागाचे अधिकारी व ठेकेदार यांचे वृक्ष तोडणार यांचे साटेलोटे असल्याच्या बोलले जात आहे. म्हणून स्थानिक अधिकारी यांनी तक्रारदार यांच्या विरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन आम्ही सर्व रीतसर कारवाई करण्यासाठी आले असून आम्हाला आमचे कामगार करू द्या, असे बोलून त्या तक्रारदार यांच्या मुसक्या दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या इतक्या दिवसापासून पाचोरा तालुक्यात नाकेदार हे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांकडून ते घेऊन साटेलोटे करीत असून कुठल्याही समर्थाची कारवाई करीत नाही म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध झाडे तोडण्याचा साठा आढळून आलेला आहे.