वनविभागाची कारवाई : गावठी हातभट्ट्या केल्या उध्दवस्त

यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टी दारू व अत्यंत घातक रसायनाद्वारे तयार होत असल्याची माहिती वनविभागाला‍ मिळाली. त्यानुसार वनविभागाने कारवाई करत दोन गावठी हातभट्ट्या नष्ट केले आहे.

यावल तालुक्यातील वनपरिक्षेत्र यावल पूर्व अंतर्गत नियतक्षेत्र बोरखेडा बुद्रुक महसुली हद्दीपासून ५०० ते १००० मीटर अंतरावर चिचखोपा नाला व भवानी नाला परिसरामध्ये वन विभागाने केलेल्या धडक कारवाई करत २ अवैध गावठी दारू भट्ट्यांसह, ८ बॅरल गावठी दारूचे रसायन (१६०० लिटर) किंमत ५६ हजार किमतीचे रसायन व प्लास्टिक बॅरल जागेवरच नष्ट केले. ४ लोखंडी बॅरल व अन्य लोखंडी साहित्य अंदाजे किंमत २ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत वनरक्षक बोरखेडा बुद्रुक यांचे कडील परीपत्रक गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई धुळे वनसंरक्षक निनु सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल परिक्षेत्र विभागाचे सहाय्यक वनसंरक्षण समाधान पाटील, स्वप्नील फटांगरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यात पथकातील वनपाल गस्तीपथक आर. एम. जाधव, आर. बी. थोरात, वनरक्षक प्रकाश बारेला, नानसिंग बारेला, सुपडू सपकाळे, राजू बोंडल, बालाजी जोहरी, इंद्रकुमार लखवादे, मनीष बारेला, अनिल बारेला, कॉन्स्टेबल सचिन तडवी, वनसेवक अस्लम, शालम तसेच वाहनचालक आनंदा तेली, सचिन चव्हाण, अमोल पाटील, कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क भुसावळचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवने व जवान नंदू ननावरे यांचे सहकार्य लाभले.

Protected Content