Home प्रशासन तहसील अवैध वाळू वाहतुकीविरोधात रावेर तहसीलदारांची कारवाई

अवैध वाळू वाहतुकीविरोधात रावेर तहसीलदारांची कारवाई


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील विवरा येथे विना परवाना अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाच्या टीमने पकडले आहे. तहसीलदार बंडू कापसे यांच्या नेतृत्वाखाली ६ फेब्रुवारीच्या रात्री ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने अवैध वाळू व मुरूम तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू व मुरूमची बेकायदा तस्करी सुरू असून महसूल विभागाकडून अशा कारवाया होण्याची नागरिकांकडून मागणी होत होती. मात्र, तहसीलदार सर्वत्र लक्ष देऊ शकत नसल्याने मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांचे दुर्लक्ष संशय निर्माण करत आहे.

विशेषत: पाल, खिरवळ आणि ऐनपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर गौण खनिज वाहतूक होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. स्थानिक तलाठ्यांच्या दुर्लक्षामुळे या वाहतुकीला प्रोत्साहन मिळत असल्याचे बोलले जात आहे. तहसीलदार बंडू कापसे यांच्या या कारवाईबाबत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून महसूल विभागाने नियमित तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

 


Protected Content

Play sound