आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी आमोद्यातील दोन मुलांवर कारवाई

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील आमोदा येथील दोन अल्पवयीन मुलांनी महापुरूषांबाबत टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

 

आमोदा येथील येथील दोन अल्पवयीन मुलांनी  दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून टाकल्याने त्या अल्पवयीन मुलांवर फैजपुर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक  १७ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन जळगांव बाल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना बाल सुधार गृहात पाठविण्याचे आदेश दिले.

 

पोलीस सूत्रांकडून  मिळालेल्या माहितीनुसार, आमोदे, ता. यावल येथील रहिवासी  दोन अल्पवयीन शाळकरी मुलांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केले. त्यामुळे त्यांच्यावर फैजपूर पोलिसात ए एस आय विजय चौधरी यांच्या फिर्यादीवरून तात्काळ गुन्हा नोंद करून त्यांचेवर आयपीसी कलम १५३ अ नुसार कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास एपीआय निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय एम.जे. शेख, हेडकॉन्स्टेबल उमेश चौधरी करीत आहेत.

Protected Content