अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरात बऱ्याच दिवसांपासून वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्याने चोपडा येथील पथक नेमून वीज चोरी शोध मोहीम राबविण्यात आली. यात ३०१ वीज चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
या पाश्वभूमिवर धरणगाव येथील कार्यकारी अभियंता रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नेमून ता.1 व 2 रोजी शहरातील वेगवेगळ्या भागात मीटर तपासले असता तब्बल 301 (तीनशे एक )मीटर मध्ये वीज चोरी होत असल्याने कडक कारवाई करण्यात आली.
शहरात तांबेपुरा, सानेनगर, इस्लामपुरा यासह आदी भागात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील अमळनेर शहरासह धरणगाव, एरंडोल, चोपडा येथील पथक नेमून वीज चोरी शोध मोहीम राबवीण्यात आली. यात 1 ऑगस्ट रोजी 132 वीज चोरी तर आज 169 असे एकूण 301 वीज चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आल्याने बऱ्याच विजचोरी करणाऱ्यांचे गेल्या दोन दिवसांपासुन धाबे दणाणले आहे. यासाठी धरणगाव उपविभागीय कार्यालय अंतर्गत तब्बल 110 कर्मचारीचा समावेश होता.
यांनी राबविली शोध मोहीम
उपविभागीय कार्यकारी अभियंता रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाने अमळनेर येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत ठाकरे,सहाय्यक अभियंता विजय माळी, निलेश कुरसंगे, वैभव देशमुख, देवेद्र चौधरी, विजय गुजर, श्रीमती सलामे मॅडम यांच्यासह जवळपास 110 वीज कर्मचारी यांनी वीज चोरी शोध मोहीम राबवली.