भुसावळ येथे होळी दहन करणाऱ्यांवर कारवाई ! (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने जामनेर रोडवरील वाल्मिक नगरात होलिका दहन करणाऱ्या नागरिकांवर बाजारपेठ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी कारवाई केली.

जळगांव जिल्ह्यात जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशावरून २८ तारखेच्या रात्रीपासून तीन दिवसांचा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली असून लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी भुसावळ उपविभागतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दिवसभरात प्रशासनाला लॉकडाउनचा चांगला प्रतिसाद दिला. पण सायंकाळी यैन वेळेस भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील वाल्मिक नगर भागातील नागरिकांनी जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून होळी दहन करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश बाजारपेठ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधिक्षक यांनी  दिले.

Protected Content