भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव परिसरात बेकायदेशीर गुटखाची वाहतूक करणाऱ्या चार जणांवर पोलीसांनी छापा टाकून सुमारे १८ लाख ९६ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातून जळगाव जिल्ह्यात चोरट्या मार्गाने विमल पान मसाला आणि सुगंधी पान मसाला वरणगावमार्गे येत असल्याची गोपनिय माहिती वरणगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार २४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीसांनी सापळा रचून बोलेरो वाहनाची तपासणी करतांना चार जण सुमारे १४ लाख ९६ हजार रूपयांचा गुटखा आढळून आला. यात रियाज अलि लियाकत (वय-३०) रा. नशिराबाद, सिकंदर कुमार लालदेव सनी (वय-२०) रा. बिहार ह.मु. नशिराबाद, गणेश नथ्थू चव्हाण रा. नशिराबाद यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून एक फरार झाला आहे. त्यांच्या ताब्यातील ४ लाख रूपये किंमतीचा बोलेरे आणि मुद्देमाला असा एकुण १८ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून चार जणांवर वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक नितीन गणपुरे करीत आहे.