अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा गावाजवळून बेकायदेशीरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर अमळनेर पोलीसांनी करवाई केली असून वाळूने भरलेले डंपर पोलीसांनी शनिवारी १८ मे रोजी दुपारी ४ वाजता जप्त केले आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात डंपरचालक व क्लिनर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा गावाजवळून डंपरमधून बेकायदेशीरपण वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती अमळनेर पोलीसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शनिवारी १८ मे रोजी दुपारी ४ वाजता टाकरखेडा गावाजवळ कारवाई करत वाळूने भरलेला डंपर क्रमांक (एमएच १९ सीवाय ९०८५) पकडला. यावेळी वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला असताना डंपरचालक राधेश्याम अर्जून पाटील वय ४६ आणि क्लिनर प्रविण प्रतान नन्नवरे वय ४२ दोन्ही रा. बांभोरी ता. धरणगाव यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार पोलीसांनी वाळूने भरलेले डंपर जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात डंपरचालक राधेश्याम अर्जून पाटील वय ४६ आणि क्लिनर प्रविण प्रतान नन्नवरे वय ४२ दोन्ही रा. बांभोरी ता. धरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदेश पाटील हे करीत आहे.