भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील समतानगरातील रहिवासी आतीश रवींद्र खरात याला पोलीस प्रशासनाने संघटीत गुन्हेगारीच्या कायद्याच्या अंतर्गत एमपीडीए लावत एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे.
भुसावळातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सराईत गुन्हेगारांच्या विरोधात हद्दपारी, एमपीडीए आदी कार्यवाहींच्या माध्यमातून धडक मोहिम सुरू केली आहे. यात आता आतीश रवींद्र खरात याच्या विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे आतीश रवींद्र खरात याला एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. त्याला ठाणे येथील कारागृहात एक वर्ष स्थानबध्द करण्यात येणार आहे. तर, याच प्रकारे अजून इतरांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.